23 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

इगतपुरीच्या सिद्धिविनायक पथकाने  फोडली नाशिकरोडची दही हंडी ; दोन लाख ५१ हजारांचे पारितोषिक जिंकले 

283 Post Views

 

नाशिकरोड : प्रतिनिधी

शिवसेना प्रणित जय बजरंग मित्रमंडळा तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सहा थर लावत इगतपुरी येथील सिध्दीविनायक गोविंदा पथकांने दही हंडी फोडून दोन लाख ५१ हजाराचे पारितोषिक जिंकले. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, इन्स्टा वरील स्टार हर्षदा जाधव, उदे ग अंबे उदे सिरीयल बाल रेणुका आराध्या लवटे हे उत्सवाचे आकर्षक होते.

यावेळी गोविंदा रे गोपाळा देवकीचा नंदलाला, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात नागरिकांनी टाळयाच्या गजरात, गाण्यावर नृत्य करीत उत्सावाचा आनंद लुटला. याप्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव रामजी रेपाळे,  माजी खासदार हेमंत  गोडसे, आमदार सरोज आहिरे,  विजय  करंजकर,  अजय  बोरस्ते, राजुआण्णा लवटे,  प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक सुर्यकांत लवटे, रमेश धोंगडे. प्रताप मेहरोलीया, दिनकर आढाव, संतोष साळवे, शाम खोले, मनोहर कोरडे, शिवा ताकाटे, शांताराम घंटे, नितीन खर्जुल,  राहुल ताजनपुरे,  प्रवीण पाळदे, बापू
सापुते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजन कृष्णा लवटे, गिरीष लवटे, स्वप्निल लवटे, संदेश  लवटे, अक्षय मोरे, कुमार पगारे, योगेश शिंदे, बलराम पारचा, जितेंद्र लासुरे, राहुल म्हसके, स्वप्निल ओढेकर, किरण लवटे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles