19.1 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

देवळाली रेल्वे स्थानकाचा शताब्दी महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

259 Post Views

 

नाशिक रोड : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात देवळाली स्थानकाचा शताब्दी महोत्सव  मोठ्या उत्साहात साजरा झाला. भुसावळ विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनीलकुमार सुमन, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी, वरिष्ठ विभागीय अधिकारी दिलीप खरात, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता रोहित राजपूत यांची प्रमुख उपस्थित होती. नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाच्या बँडने सर्वांचे स्वागत केले.

देवळालीतील चार शाळांतील साडे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी तिरंगी ध्वजाच्या रंग संगतीत खास आसनव्यवस्था व कॅपची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण होते. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून देवळाली स्थानकाचा ठसा असलेला विशेष शताब्दी केक कापण्यात आला.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. चित्रकला व निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले.रेल्वे स्थानक तिरंगी रोषणाईने उजळले होते. यानिमित्ताने उभारलेल्या पंचवटी रेल्वे संग्रहालयात दुर्मिळ आणि ऐतिहासिक रेल्वे उपकरणांचे तसेच यांत्रिक कोचेस, वॅगन्स, विद्युत इंजिने आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थी, नागरिकांनी त्यांना भेट दिली. विभागीय व्यवस्थापकांनी प्रेरणादायी भाषण केले. राष्ट्रीय गीताने महोत्सवाचा समारोप झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles