17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

भगूर रेल्वे पुलाखालचे पाणी काढा!; अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू ! प्रेरणा बलकवडे यांचा इशारा

467 Post Views
  • नाशिकरोड : उमेश देशमुख

भगूर रेल्वे पुलाखाली पावसाच्या पाण्याचा डोह निर्माण झालेला आहे. वाहनधारक अन् पादचारी नागरिकांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना त्यामुळे मोठा त्रास सोसावा लागतो. नगरपालिकेने योग्यवेळी दखल घेऊन समस्या मार्गी लावावी. नाही तर नगर पालिकेला टाळे ठोकून आम्हीच पाण्याचा निचरा करु, असा इशारा राष्ट्रवादी महिला विभागाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी दिला.

रेल्वे प्रशासनाने बोघद्याचे काम केले आहे. त्यातून पाणी पाझरते. पुढे सार्वजनीक बांधकाम विभागातील निधीने रस्त्याचे काम केले. नगरपालिकेने एक बाजुने ड्रेनेजचे काम केले. दुसऱ्या बाजुने बोगद्याचे काम आतिक्रमणामुळे बंद होते. आतिक्रमण राष्ट्रवादी महिलाकाँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी काढून नागरिकांच्या सोयी साठी कच्चा रस्ता स्वखर्चाने तयार करुन दिला. त्यानंतर आमदार सरोज ताई आहिरे यांच्या निधितून ट्रिमीक्स टाकून रस्ता पक्का करण्यात आला.या बोगद्याचे काम रेल्वे प्रशासनाने चुकिचे केले आहे. यात पाणि पाझरते. त्याला बाहेर पडायला ड्रेनेज सिस्टिम केलेले नाही. नगरपालिकेने रोडला जे ड्रेनेज केले त्याची उंची चुकली असुन त्यातून पाणी बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे पाणी तुंबत असल्याचा आरोप बलकवडे यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles