23 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवकाल दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन ; शिवसेना युवा नेते योगेश सत्यभामा गाडेकर यांचे ठाकरे यांच्याकडून कौतुक

572 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे नुकताच शिवकाल दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन झाले. यावेळी खासदार संजय राऊत, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे युवा नेते योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी गाडेकर यांच्या दिनदर्शिकेचे कौतुक केले.

दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्या दरम्यान विनायक राऊत, शिवसेना उपनेते सुनिलभाऊ बागुल,माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख विलास आण्णा शिंदे, उपजिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी, माजी महापौर यतीन वाघ, संजय चव्हाण, राजेंद्र देसाई, मसुद जिलानी आदी उपस्थित होते.

शिवकाल दिनदर्शिके बाबत ठाकरे म्हणाले

शिवकाल दिनदर्शिका २०२५ चे कौतुक करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण शिवकाल उलगडून दाखविणारी दिनदर्शिका आहे. प्रत्येकाच्या घरातील भिंतींवर दिनदर्शिका असते. पण त्यात काय असावे,आणि नसावे, हे महत्वाचे आहे. सर्वसामान्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तारखेनुसार काय घडले, याची माहिती समजण्यासाठी प्रथमच ‘शिवकाल दिनदर्शिका’ बनविली आहे. त्याचे कौतुक करावे , तेवढे कमी असल्याचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले.

आयोजक योगेश गाडेकर म्हणाले

दिनदर्शिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंतचे जवळपास ३०० पेक्षा जास्त प्रसंग तारखेनुसार आपणास वाचावयास मिळतील. महाराजांना चांगल्या – वाईट अशा असंख्य प्रसंगांना सामोरे जावे लागले. याविषयी परिपूर्ण माहिती या दिनदर्शिकेत आपणास पहावयास मिळणार आहे. अनेक ग्रंथांचा संदर्भ घेऊन ही कालदर्शिका आम्ही साकारलेली आहे.शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा स्वराज्य अधिक बळकट करणारा होता. रोज सकाळी उठल्यावर आपण जर महाराजांच्या जीवनातील त्या तारखेचा प्रसंग वाचला व आपल्या दिनचर्येची सुरवात केली तर नक्कीच दिवसभर आपल्याला प्रेरणा मिळत राहील. याचा आम्हाला विश्वास आहे. यामुळे आपल्या मुलांना इतिहासाची देखील माहिती मिळेल. दरम्यान दिनदर्शिका माहिती व संकलन अंकुर काळे व सर्व चित्र हे जेष्ठ शिवसैनिक तथा चित्रकार रमेश जाधव सर यांनी रेखाटलेले आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles