658 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघात जनतेने मला पुन्हा एकदा निवडून दिले. त्यामुळे मी जनतेचे मनःपूर्वक आभार मानते. दुसऱ्यांदा संधी दिल्यामुळे देवळालीत सुरू केलेली विकासाची गंगा अविरतपणे सुरू ठेवेन,असे वचन नवनिर्वाचित आमदार सरोज अहिरे यांनी विजयाची प्रतिक्रिया देताना दिले. ४० हजार ४६३ मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला. त्यांना ८१ हजार २९७ मते मिळाली. राजश्री अहिराव ४० हजार ८३४ मते मिळवत दुसऱ्या तर योगेश घोलप ३८ हजार ७१० मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आमदार सरोज अहिरे यांच्यापुढे विजयासाठी मोठे आव्हान निर्माण झालेले दिसत होते. परंतु आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजय संपादित केला. आणि आपल्या कार्याचा ठसा मतदारसंघांमध्ये उमटवला. आमदार अहिरे यांच्या विजयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री अहिराव यांना मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार योगेश घोलप यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान राजश्री अहिरराव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवील्यामुळे राजकीय पटलावर आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक पाहिले गेले तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप राहतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु प्रत्यक्षात घोलप तिसऱ्या क्रमांकावर गेले. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल म्हणजे जोर का झटका धीरसे लगे, असा असल्याचे बोलले जात आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय