437 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असणार आहे. माजी आमदार योगेश घोलप प्रचंड मताने निवडून येतील, मतदारसंघातील नागरिकांकडून घोलप यांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याचा परिणाम म्हणून योगेश घोलप पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील, असा ठाम विश्वास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांनी व्यक्त केला आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारादरम्यान मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये ठीक ठिकाणी माजी आमदार योगेश घोलप यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मागील काही वर्षात देवळाली विधानसभा मतदार संघात संघामध्ये जनतेला हुकूमशाही नेतृत्व मिळाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गोरगरिबांचा आवाज दाबला जातो.सामान्य जनतेच्या समस्या अडचणीची हुकूमशाही नेतृत्व दखल घेत नाही, म्हणून सामान्य जनतेमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण दिसते. त्याचा परिणाम मतदान निकालानंतर दिसून येईल. माजी आमदार योगेश घोलप यांचा यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केली. कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार केला नाही. तसेच गोरगरीब जनतेचे मत विचारात घेऊन कामे केली. त्यामुळे मतदार संघात पुन्हा एकदा योगेश घोलप यांना जनता जनार्दन निवडून देतील,असे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा निश्चित लाभ देवळाली मतदारसंघातील जनतेला होईल, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांनी म्हटले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय