688 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अँड राहुल ढिकले निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. 23 नोव्हेंबर म्हणजेच निकालाच्या दिवशी ढिकले यांची आमदारकीची दुसरी टर्म सुरू होईल. असा विश्वास महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी व्यक्त केला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक होत आहे. सामान्य मतदार धनशक्तीच्या पाठीमागे कधीच उभे राहत नाही, असा आजवरचा इतिहास आहे. जनशक्ती हीच सामान्य मतदारांच्या हिताची आहे. त्यामुळे धनशक्तीला ठोकर मारून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना येथील मतदार मोठ्या मताधिक्याने विजय करणार आहे. नाशिक पूर्वचे मतदार अतिशय जागरूक आणि सुज्ञ आहेत. ते पुन्हा एकदा अँड ढिकले यांना विधानसभेत पाठविणार आहे. यात कुणाच्याही मनात तीळ मात्र शंका घेण्याचे कारण नाही. आमदार ढिकले यांनी संपूर्ण नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात ठीक ठिकाणी विकास कामे केली. मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी महापालिका तसेच शासन दरबारी प्रामाणिकपणे पाठपुरावा केला. नागरिकांच्या सतत संपर्कात राहणारा प्रतिनिधी अशी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ओळख निर्माण केली.आपण आमदार असल्याचा बडेजाव त्यांनी कधीच मिरवला नाही. त्यांच्या वर्तवणुकीतून कधीच जनतेला आमदारकीचा गर्व दिसला नाही. अतिशय साधे राहणीमान आणि जनतेच्या मदतीला तातडीने धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार राहुल ढिकले आहे, अशी प्रतिमा त्यांची निर्माण झालेली दिसते.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय