899 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदार संघामध्ये सिद्ध पिंप्री गावाचा समावेश आहे. मागील पाच वर्षात गावात सुमारे ४८ कोटीचे विविध विकास कामे झाली. तीस वर्षाची जी कामे झाली नाही, ती केवळ पाच वर्षात पूर्ण झाली. त्यामुळे गावातील नागरिक समाधानी आहेत. त्याचा परिणाम म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत आमदार सरोज अहिरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. असे सिद्ध पिंप्रीचे सरपंच भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले यांनी ठामपणे सांगितले.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार दहा हजार २५३ मतदार गावात आहे. यामध्ये अंदाज अंदाजे चार ते पाच हजारांची वाढ झालेली दिसते. विधानसभेत विधानसभा निवडणुकीला जे मतदान होईल, त्यातील ७० ते ८० टक्के मतदान आमदार सरोज अहिरे यांच्या बाजूने होईल, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी पाच वर्षात गावात केलेली विकास कामे असल्याचा दावा सरपंच ढिकले यांनी केला आहे. आमदार सरोज अहिरे यांच्या निधीमधून गावात तीन सभामंडप, एक बुद्ध विहार उभारले. ओझर ते पिंप्री अडीच किलोमीटर चा रस्ता पूर्ण केला. बाफना वेअर हाऊस ते पिंप्री रस्ता देखील पूर्ण झाला. तसेच दहावा मैल ते पिंप्री रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्याचप्रमाणे चितेगाव, चेहडी, ओढा आणि किसान नगर आदी रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहे.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय