568 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः निर्णय घेणार आहे. गुरुवारी ( दि ७ ) रोजी दुपारपर्यंत निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. बुधवारी सायंकाळी सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत पाठिंब्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले. त्यामुळे महायुतीच्या सर्वच नेत्यांना निर्णया विषयी उत्सुकता आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. शिवसेना शिंदे गटाने ऐनवेळी राजश्री अहिरराव यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यानंतर पुन्हा माघारीच्या दिवशी अहिरराव यांना माघार घेण्यास सांगितले. परंतु त्यांचा मोबाईल सतत नोटरीचेबल होता.त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. परिणामी उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना शिंदे गटांमध्ये गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचार नेमका कुणाचा करायचा याविषयी संभ्रम निर्माण झाला. यातील काही पदाधिकारी महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्या बाजूने प्रचार करावयास हवा तर काही पदाधिकारी अहिराव यांनाच अधिकृत उमेदवार समजून शिंदे गटाने त्यांच्या बाजूने प्रचार करावा,असे दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागली. त्यामुळे नेमका प्रचार कुणाचा करायचा याविषयी निर्णय शहर पातळीवर होऊ शकला नाही. परिणामी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. गुरुवारी दुपारपर्यंत शिंदे निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे आता शिंदे काय निर्णय घेणार, यावरच देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीची भूमिका ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट संजीवनी लॉन्स