22.4 C
Nashik
Saturday, October 3, 2026
spot_img

गांधी जयंतीनिमित्त नाशिकरोडला देश भक्तीपर गीते, स्वच्छता मोहीम

82 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकरोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गांधीजींच्या स्वच्छता व सामाजिक बांधिलकीच्या विचारांना अभिवादन करत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिकरोड अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच आजूबाजूच्या भागातील कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा इतरत्र न टाकता योग्य ठिकाणी द्यावा आणि स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनवावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी केले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर स्वच्छता अभियानांना चालना देण्यात येत असून, २ ऑक्टोबर हा ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून विविध स्वच्छता उपक्रम आयोजित केले जात आहेत.स्वच्छ आणि निरोगी परिसर ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, स्वच्छतेचा संदेश केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर कृतीतून जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

दरम्यान “स्वच्छ नाशिकरोड, सुंदर नाशिकरोड” या भावनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम* महात्मा गांधी पुतळा, नाशिकरोड येथे आयोजित करून राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते गजानन शेलार, शहराध्यक्ष छबू भाऊ नागरे, नाशिकरोड अध्यक्ष राजाभाऊ जाधव,राजाभाऊ पवार, संजय पोरजे, भाईजान बाटलीवाला, संतोष गाडेकर, गणेश मोरे, प्रवीण बैसाणे, निखिल भागवत,तुषार वाघमारे, मिलिंद चंदेले, अजित सातपुते, बाळासाहेब अस्वले, निलेश जगताप, नामदेव गोपाळ, कुणाल पाठक, राजू पवार, पवन मुकणे, विजय होलीन, अविनाश घुगे, राहुल पालवे, दीपक नितनवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles