961 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
प्रभाग १८ मधील नवनिर्वाचित नगरसेवक शरद मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या दोन युवकांनी मोरे यांच्या श्रीमुखात मारली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोरे आणि त्यांचे सहकारी गोंधळून गेले. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान मोरे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे ते रुग्णायातल देखील भरती होते. अजूनही त्यांना पूर्ण बरे वाटत नाही. निवडणुकीत विजयी झाल्याने आपल्या निवासस्थानी ते नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. त्यावेळी ही घटना घडली. घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातो आहे.

मारहाण करणारे अज्ञात युवक प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आशा पवार आणि माजी नगरसेवक पवन पवार यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. निकाल लागण्यानंतर सायंकाळच्या वेळेला ही घटना घडली. पराभव सहन न झाल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांनी केलेले कृती गैर असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच थरारून व्यक्त होतांना दिसत आहे. प्रभाग १८ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून भारतीय जनता पार्टी कडून शरद चिंतामण मोरे उमेदवार होते. तर शिवसेना शिंदे गटाकडून आशा चंद्रकात पवार उमेदवार होत्या. दोघांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. कमी मतांच्या फरकाने आशा पवार यांना पराभव पत्करावा लागला.तर मागील २०१७ मधील निवडणुकीत देखील शरद मोरे विजयी झाले आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
भाजप अन् शिंदे गटात कलह
प्रभाग १८ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. यात भाजपचे विशाल संगमनेरे, शरद मोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सुनीता भोजने व रंजना बोराडे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे येथे शिंदे गट आणि भाजप एकमेकांचे स्पर्धक मानले जात आहे.



