19.1 C
Nashik
Wednesday, February 4, 2026
spot_img

आमच ठरलंय…, प्रभाग १८ च्या नगरसेविका सुनीता सागर भोजने ! ; शिवसेना धनुष्यबाण मारणार बाजी !

353 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

प्रभाग १८ मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुनीता सागर भोजने निवडणूक रिंगणात आहे. प्रचारादरम्यान त्यांना मतदारांचा सकारात्मक अनुभव येतो आहे. आम्ही निश्चय पक्का केला असून आमचं ठरलंय की यावेळेला तुम्हीच म्हणजे सुनिता सागर भोजने नगरसेविका होणार आहे. अशी माहिती सुनीता भोजने यांनी दिली.

जेलरोड येथील प्रभाग १८ मधील महिला सर्वसाधारण प्रवर्गातून सुनीता सागर भोजने शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली दिसते. त्यांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर अधिक भर आहे. यादरम्यान त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत असून आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.असा विश्वास त्यांना दिला जात असल्याचे सुनीता भोजने यांनी सांगितले. सुनीता भोजने यांनी पुढे सांगितले की प्रभागात महिला वर्गांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत. यापैकी सर्वात मोठे आणि महत्त्वाची समस्या म्हणजे कमी दाबाने येणारे पिण्याचे पाणी ही आहे.जनता माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. त्यामुळे ते मला नाशिक महापालिकेत प्रभाग १८ चे प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरसेविका म्हणून निवडणून देतील, यात शंका नाही. सदस्य म्हणून पदभार स्वीकारल्यावर पहिले काम प्राधान्याने प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची असणार आहे.असे सुनीता सागर भोजने यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे यावेळेला प्रभागात विजय आपलाच असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांसाठी ग्रीन जिम

प्रभागात महिलांसाठी ग्रीन जिम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा, उद्यानाची बकाल अवस्था, बंद पथदीप, पंचक दवाखाना अद्यावत करणे असे एक ना अनेक प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून ते प्रश्न सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे केले जाणार आहे.

भाजी बाजाराची समस्या कायम

मागील अनेक वर्षापासून भाजी बाजाराची समस्या रेंगाळलेली आहे. आजवर अनेक नगरसेवक आले आणि गेले पण भाजी बाजाराची समस्या जैसे थे अशीच दिसते. रस्त्यावर भरणारा भाजी बाजार संपूर्ण नाशिक शहरात कुप्रसिद्ध झालेला दिसतो. भाजी विक्रेत्याना महापालिका अधिकृत जागा उपलब्ध करून देत नाही. अशा ठिकाणी जागा दिलेली आहे की तेथे एकही ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी जाणार नाही. ही समस्या भाजी विक्रेते यांच्यासोबत चर्चा करून सोडविण्यावर भर दिला जाईल.असे सुनीता सागर भोजने यांनी म्हटले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles