17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

रेल्वे प्रवाशांचे सामान चोरी करणारा अटकेत

162 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्तीदरम्यान संशयिताला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीतून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. देवगिरी एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेसमधून चोरी गेलेल्या दोन बॅगा आणि सोन्या चांदीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

२५ ऑगस्ट रोजी देवगिरी एक्सप्रेसमध्ये नाशिक येथील कार्यरत तिकीट तपासणीस अशोककुमार यादव यांची काळ्या रंगाची बॅग चोरट्याने लंपास केली होती. या बॅगेत रेल्वे टीसीचा कोट, बॅच, नेमप्लेट, ओळखपत्रे, ड्युटी पास, तक्रार पुस्तिका आणि कपडे असा एकूण ५,५०० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाल करणारा तेजस अजित छाबडा (रा. इगतपुरी) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून यादव यांची बॅग मिळाली. त्याने चोरीची कबुली दिली.तेजस याने १४ ऑगस्ट रोजी अमरावती एक्सप्रेसमधून देखील प्रवाशाची बॅग चोरल्याची कबुली दिली.

यातील सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालात ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅमचे पॅन्डेंट, ६ ग्रॅमचे मणी व १५० ग्रॅमचे पैंजण असून त्याची एकूण किंमत ९५,५०० रुपये आहे.मोहिमेत प्रभारी अधिकारी सचिन बनकर, आरपीएफ निरीक्षक नवीन प्रतापसिंह, उपनिरीक्षक राजेश सोनवणे, हवालदार शैलेंद्र पाटील, राज बच्छाव, मनीष कुमार, के. के. यादव, सागर वर्मा यांनी सहभाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles