23 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

गुड न्यूज : संरपच परिषदेच्या नाशिक तालुकाध्यक्षपदी वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांची निवड

1,162 Post Views

इगतपुरी : तालुका प्रतिनिधी

राज्यातील सर्व सरपंचांच्या शासकीय पातळीवरील न्याय हक्कासाठी आणि जनतेच्या मूलभूत सोयी सुविधा वेळेत मिळाव्या म्हणून सरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली असून नाशिक तालुक्यातील वांजारवाडी येथील सरपंच तथा नामवंत पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे यांची नाशिक तालुका सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.

शिंदे यांची नाशिक तालुक्यात आणि जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी दिलेल्या गावपातळीवर तसेच इगतपुरी आणि नाशिक तसेच सिन्नर तालुक्यातील योगदानाबद्दल गावच्या नागरिकांनी दाखल घेवून त्याची वांजारवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या गुरू हनुमान आखाड्यात अनेक युवा पहिलवान पुढे येत आहेत.यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, सारुळ सरपंच सदानंद नवले,नवनाथ गायधनी,मुन्ना दोंदे,निवृत्ती मुठा ळ आदींसह विविध गावचे सरपंच,उपसरपंच उपस्थित होते. यावेळी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles