491 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. देवळाली मतदार संघात परिवर्तन निश्चितपणे होईल, असे मतदारांच्या प्रतिसादावरून निदर्शनास येत आहे. त्यामुळे २०२४ पासून राज्यातील विधिमंडळात देवळालीचे नेतृत्व माजी आमदार योगेश घोलप करणार, असा दावा शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांनी केला आहे.
गणेश गायधनी यांनी सांगितले की, देवळाली विधानसभा मतदारसंघात योगेश घोलप ठिकठिकाणी प्रचार दौरा करीत आहे. दौऱ्याप्रसंगी नागरिकांचा घोलप यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून या वेळेला नागरिकांनी देवळाली विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करणे जवळपास निश्चित केले आहे देवळाली मतदारसंघात विकास कामांचा बागुलबुवा केला जातो आहे. विकास कामे झाली पण ती निकृष्ट दर्जाची झाली. अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे सुज्ञ मतदारांचे लक्ष आहे. त्यामुळे विकास कामांचा कितीही गाजावाजा केला, तरी ती निकृष्ट दर्जाचे कामे असल्यामुळे त्याच्यावर पाणी फिरले गेले. असे गणेश गायधनी यांनी म्हटले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय