सनदी लेखापाल क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी सी.ए च्या परीक्षाचे निकाल नुकताच जाहीर झालाअसून कु. शामल काळे या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. सी.ए.अकाउंटिंग आणि फायनान्स मधील एक आव्हानात्मक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे .ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम व सातत्य व चिकाटी आवश्यक असते. शामल काळे या मविप्र संचलित एस. व्हि. के. टी .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव काळे यांची सुकन्या आहे .शामलच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्रीरामनगर ता.निफाड येथील काळे परिवार ,ग्रामस्थ तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्र्वासराव मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर ,उपसभापती डी . बी.आण्णा मोगल सरचिटणीस , नितीनजी ठाकरे चिटणीस दिलिप दळवी, निफाड संचालक शिवा गडाख, ग्रामीणचे संचालक रमेश (आबा) पिंगळे व सर्व पदाधिकारी संचालक मंडळासह समाजातील सर्व घटकांकडून अभिनंदन होत आहे. शामल काळे यांनी या अगोदर महाविद्यालय शिक्षकांसाठी घेतली जाणारी वाणिज्य शाखेतील राज्यस्तरीय चाचणी परीक्षा सेट व विधीक्षेत्रातील एल.एल.बी. पदवी प्राप्त केली आहे.