37 C
Nashik
Wednesday, May 6, 2026
spot_img

माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना जामीन मंजूर ! सात महिन्यानंतर तुरुंगाच्या बाहेर येणार

543 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

मागील सात महिन्यापासून धोत्रे खून प्रकरणात संशयित म्हणून न्यायालयीन कोठडी भोगणारे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना मंगळवारी ( दि.५ ) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यापूर्वी देखील जामीन मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी तो मंजूर होऊ शकला नाही. अखेर मंगळवारी जामीन मंजूर झाल्यामुळे निमसे शनिवारी किंवा सोमवारी तुरुंगाबाहेर येऊ शकतात. दरम्यान जामीन मंजूर झाल्यामुळे उद्धव बाबा समर्थकांमध्ये आनंदाचे तसेच समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्धव बाबूराव निमसे यांनी २०१७ मध्ये भाजपकडून वॉर्ड क्र. २ मधून निवडणूक लढवत जिंकली होती. दरम्यान २०२५ मध्ये राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात संशयित आरोपी होते.त्यामुळे ते पोलिसांपुढे शरण आले होते. या गंभीर गुन्ह्यामुळे ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयीन कामकाज ॲड. अशोक मुंदर्गी यांनी पाहिले. उद्धव निमसे यांचे पुत्र नगरसेवक रिद्धेश निमसे यांनी जामीनाबाबत दुसरा दिला आहे.

घटनेची पार्श्वभूमी अशी

ऑगस्ट २०२५ मध्ये नांदूरनाका येथील राहुल धोत्रे हत्येप्रकरणी मुख्य संशयित आरोपी, सुरुवातीला उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर १५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांना शरण, सध्या जेलमध्ये,पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्यांच्या मदतीने सशस्त्र हल्ला आणि खुनाचा आरोप, घटनेनंतर सुमारे २० दिवस फरार राहिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली., महापालिका निवडणुकीत त्यांचे पुत्र रिद्धेश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी आणि नगरसेवक म्हणून विजयी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles