19.1 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

खेळामुळे शरीर सुदृढ व सक्षम ! ; बाबुशेठ कृष्णानी यांचे प्रतिपादन

157 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

कबड्डीसारख्या सांघिक खेळामध्ये अनेक कौशल्यांचे दर्शन घडते. केवळ खेळाडूच नाही तर प्रेक्षकही श्वास रोखून पुर्णवेळ खेळात रममाण होतात. असे प्रतिपादन देवळाली कॅम्प शहरातील व्यावसायिक बाबुशेठ कृष्णाने यांनी केले. देवळाली महोत्सव अंतर्गत सोमवारी ( दि. २ ) पोलीस स्टेशन समोरील मैदानावर पार पडलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ओएस विवेक बंड ,सुनीता आडके , जय सुंदरमन, संजय भालेराव, खंडेराव मेढे,मीना पाटील, संदीप चौधरी,नितीन काळे, लक्ष्मी वटारे आदी उपस्थित होते.या स्पर्धेत नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प, सुभाष हायस्कूल, वासुदेव अथनी इंग्लिश मीडियम स्कूल, देवळाली हायस्कूल, जनता विद्यालय पांढुर्ली, कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल, आदर्श शिशुविहार व सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. नूतन विद्या मंदिर दिवाली कॅम्प विरुद्ध जनता विद्यालय पांढूर्ली यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात जनता विद्यालय संघाच्या खेळाडूंनी विरुद्ध नूतनच्या विद्यार्थ्यांवर मात करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेदरम्यान पंच म्हणून सतीश जाधव, विकी मुठाळ, व राष्ट्रीय खेळाडू दीपिका मौर्य अश्विनी धामे यांनी तर स्पर्धा यशस्वीतेसाठी नरहरी मुसळे राजेंद्र यशवंते ,लक्ष्मण मुसळे, मनोज कनोजिया, मुख्य आयोजक जीवन गायकवाड, राम गोडे, , नवनाथ झोंबाड, राहुल गायकवाड आदी प्रयत्नशील होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles