17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

आमदार ॲड.राहुल ढिकले यांच्याकडून विशाल संगमनेरे यांच्या विजयाचे शुभसंकेत ! सोशल मीडियावर ढिकले यांच्या भाषणाची क्लिप चर्चेत

211 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

जर जनतेच्या मनात विशाल अण्णा आहेत, तर विरोधकांनी काही जरी म्हटले तरी फरक पडणार नाही. काही जण म्हणतात की, ते जागेवर नसतात, इकडे तिकडे फिरवत. खरे बघितले तर चार वर्ष झाली ते नगरसेवक नाही. पण नगरसेवक नसतांना सर्वात जास्त कामे जर कोणी केली असतील तर ती विशाल संगमनेरे यांनी केली आहे.ते जनतेच्या मनातील नगरसेवक आहेत. जनता जनार्दन पुन्हा एकदा त्यांना नगरसेवक म्हणून संधी देऊन विरोधकांना सडेतोड उत्तर देतील,असा शुभसंकेत आमदार ॲड राहुल ढिकले यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. दरम्यान फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲप वर आमदार ढिकले यांच्या भाषणाची क्लिप बऱ्यापैकी चर्चेत आहे.

प्रभाग १८ मधील भाजपचे उमेदवार विशाल संगमनेरे, शरद मोरे , ज्योती माळवे, सुशीला बोराडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आमदार ॲड राहुल ढिकले बोलत होते. आमदार ढिकले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या भागातील पिण्याचे पाणी प्रश्न, सुरक्षेतेसाठी प्रभाग अनेक ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते, ड्रेनेज लाइन आदी कामे विशाल संगमनेरे यांच्या सोबत असलेल्या नगरसेवकांनी केले आहे.त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवित त्यांनी प्रभागातील नागरिकांसोबत कायम संपर्क ठेवला आहे. त्यामुळे या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांनी केलेली कामाची पावती म्हणून त्यांना यंदा मतदार महापालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केली.याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, जगनतात्या बोराडे, वामनराव बोराडे, पॅनल व प्रचार प्रमुख अजित बने, शंकरनाना बोराडे, मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, अरुण माळवे, नाशिकरोड भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शंतनु निसाळ,बाजीराव बोराडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रभागातील सर्व उमेदवारांनी उपस्थितांना आपला परिचय करून दिला.

उदघाटनापूर्वी प्रचार रॅलीला प्रतिसाद !

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना अगोदर चारही उमेदवार समर्थकांनी भव्य प्रचार रॅली काढली. ही रॅली पंचक गावातून शनी मंदिर, भाजी मार्केट, राज राजेश्वरी चौक, अमृत गार्डन, वसंत विहार, श्री कृष्ण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, गणेशनगर आदी भागात काढण्यात आली. यावेळी रॅलीत मोठ्या संख्येने मतदार सहभागी झाले होते. रॅलीमुळे सर्वत्र भाजपमय वातावरण दिसून येत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles