511 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
मागील काही दिवसांपासून प्रभागातील समस्या सातत्याने वाढताना दिसून येते आहे. प्रशासकीय राजवट असल्याने समस्येत भर पडली आहे. थोडक्यात विकास कामे थंडावलेली दिसतात. प्रभागात प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झालाआहे.विकासकामांना गती देण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. असे रत्ना अशोक सातभाई यांनी नाशिक बातमीदार न्यूज चॅनेल सोबत बोलतांना म्हटले.

बातमीसाठी संपर्क : 9881251787
nashikbatmidarnews.com
रत्ना अशोक सातभाई या प्रभाग १८ सर्वसाधारण महिला क या प्रवर्गातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. आपल्या निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, यापूर्वी २०१७ मध्ये नाशिक महानगर पालिकेची निवडणूक झाली. यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रिया राबवली जाते आहे. तर जवळपास तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची मुजोरी वाढलेली असून प्रभागाचा विकासच खुंटलेला आहे. ठीक ठिकाणी कॉलनी रस्त्यावर पडलेले खड्डे, काही भागात कमी दाबाने होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, बंद पडलेले पथदीप, उद्यानाची झालेली बकाल अवस्था,आरोग्याच्या सुविधांचा अभाव, डासांचा प्रादुर्भाव अशा विविध समस्या प्रभागातील नागरिकांना भेडसावताना दिसत आहे. त्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून मी प्रभाग १८ मधून निवडणूक लढविण्याचा निश्चय केलेला आहे.
प्रचारात प्रतिसाद मिळतोय !
मागील जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे.यादरम्यान मला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. निवडणूक लढविण्याच्या माझ्या निर्णयाचे स्वागत होताना दिसून येत आहे. मतदारांनी मला त्यांच्या समस्या सोडविण्याची संधी दिली तर त्याचे नक्कीच सोने करून दाखवीन असे रत्ना अशोक सातभाई यांनी म्हटले आहे.
राजकीय पार्श्वभूमीचा लाभ मिळेल !
माझे पती अशोक सातभाई १९८७ पासून सार्वजनिक जीवनात काम करीत आहे. सन २०१२ मध्ये ते प्रभाग १८ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील विविध समस्या मार्गी लावलेल्या आहेत. विकासकामे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या पावलावर पाय ठेऊन मी काम करणार आहे. त्यासाठी मतदारांनी मला प्रभाग १८ मधून निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी. अशी अपेक्षा रत्ना अशोक सातभाई यांनी नाशिक बातमीदार न्यूज चॅनेल सोबत बोलतांना व्यक्त केली.



