नाशिक महानगर पालिका पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी चर्चेने जोर धरला आहे. प्रभाग १८ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून तब्बल वीस पेक्षा अधिक इच्छुक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक शरद मोरे आणि संतोष कांबळे प्रबळ दावेदार मानले जात आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल. दरम्यान मोरे आणि कांबळे यांच्यामध्ये उमेदवारी वाटप करताना स्थानिक आणि बाहेरचा मुद्दा कळीचा ठरू शकतो.
जेलरोड परिसरातील प्रभाग १८ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील निवडणूक इच्छूक उमेदवारांच्या संख्येवरून अधिक चर्चेत आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष आणि अपक्ष असे जवळपास वीस पेक्षा अधिक इच्छुकांची नावे चर्चेत आहे. प्रत्यक्षात कोण निवडणूक लढवणार आणि कोण माघार घेणार याविषयीचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी माजी नगरसेवक शरद मोरे इच्छूक आहे. त्यांनी पक्षाकडे दावा देखील केला आहे. मोरे यांनी यांनी त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि विकासकामांसाठी पुढाकार घेतलेला आहे. स्थानिक उमेदवार ही त्यांची जमेची बाजू असून ते शांत, संयम तसेच मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ते प्रभागात परिचित आहेत. भाजप मधील गट तटाच्या राजकारणापासून दूर अशी त्यांची प्रतिमा मानली जाते.
भाजप मध्ये संतोष कांबळे यांच्या नावाची देखील चर्चा जोरात आहे. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप मधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील दिसतात. उमेदवारीसाठी कांबळे यांच्या नावाची दखल पक्ष पातळीवर घेतली जात आहे. माजी नगरसेवक शरद मोरे यांना पर्याय म्हणून कांबळे येत्या काही दिवसांपासून पुढे आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी प्रभाग १८ मध्ये जनसंपर्क वाढविलेला दिसतो. नातेवाईक आणि मित्र परिवारांकडून त्यांचा प्रचार केला जातो आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सवात हिरारीने पुढाकार घेतलेला आहे.प्रभागातील समस्या आणि नागरिकांना वेळेप्रसंगी तत्परतेने मदत करताना त्यांचा पुढाकार असतो. मागील काही दिवसांपासून ते प्रसिध्दीच्या झोतात आलेले दिसतात. आमदार ॲड राहुल ढिकले यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजप शरद मोरे यांना डावलून संतोष कांबळे यांना उमेदवारी देतात की नाही ते उमेदवारी वाटपानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत मोरे आणि कांबळे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
स्थानिक अन् बाहेरचा मुद्दा
महापालिकेच्या राजकारणात स्थानिक आणि उपरा म्हणजेच बाहेरचा असा मुद्दा सतत चर्चेत असतो. प्रभाग १८ मध्ये हा मुद्दा अतिशय कळीचा ठरणार अशी चर्चा आहे. अलीकडच्या काळात जेलरोड परिसराचा झपाट्याने विकास झालेला दिसतो. शहरीकरण वाढले, नोकरी आणि रोजगार मिळविण्यासाठी जेलरोड परिसरात वास्तव्य करणाऱ्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढलेली दिसते.त्यांनी आपली हक्काची घरे परिसरात बांधली असून ते येथील कायमचे रहिवासी बनलेले दिसतात. स्थानिक पेक्षा बाहेरच्या नागरिकांची संख्या येथे अधिक वाटते. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
पक्षनिहाय इच्छुक असे
शरद मोरे, संतोष कांबळे, संदीप निकम ( भाजप ) विशाल पवार, संजय पवार, ( शिवसेना शिंदे गट ) गणेश मोरे, निलेश गांगुर्डे, गुड्डू गवई, निलेश जगताप ( राष्ट्रवादी शरद पवार गट )प्रथमेश पवार, गौतम पगारे राष्ट्रवादी (अजित पवार गट ) शिवा गाडे शिवसेना ( शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे )सुनील जाधव, कुसुमताई चव्हाण, संदीप बारहाते ( राष्ट्रीय काँग्रेस नितीन बर्वे,शालिग्राम बनसोडे दिनेश जाधव,सचिन कटारे,( अपक्ष ) किरण गडवे (रिपब्लिकन पक्ष )