28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस नाशकात ; अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनास राहणार मुख्य उपस्थिती

779 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी ( दि.२५ ) नाशकात येणार आहे. जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होईल.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सज्ज असून सद्या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महंत सुकेणकर बाबा महानुभाव, महंत चिरडे बाबा महानुभाव आणि कृष्णराज बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप,नाशिकरोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रकाशशेठ ननावरे, दिनकर पाटील, सुभाष पावडे, प्रभाकर भोजने आदींच्या आयोजनाखाली अधिवेशन होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे,दादा भुसे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आदी मंत्रांसह जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अधिवेशनाला महानुभाव पंथांच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्यासह आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिवेशन रुपरेषा अशी

दिनांक २५ : सकाळी ८.३०
वाजता पालखी सोहळा व ग्रंथ दिंडी,ध्वजारोहण, अधिवेशनीय सभागृह व ग्रंथ नगरीचे उद्घाटन
सकाळी १० ते १२ उद्घाटकीय सत्र, १२ ते दुपारी ३ भोजन व विश्रांती.रात्री ९ ते १० द्वितीय सत्र

दिनांक २६ : सकाळी ७ वाजता भगवदगीता पाठ पारायण, स
८ वाजता अल्पहार उष्णोदक सकाळी ९ वाजता अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे समारोपीय सत्रअध्यक्ष स्थानापन्न, स्वागत समारंभ, संतपूजन प्रास्ताविक, मावळत्या अध्यक्षांचे विचार. सकाळी ११:३० वाजता नेते व संतगणांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. मोहनराज कारंजेकर बाबा यांचा अ. भा. महानुभाव परिषदेच्या पदभार स्वीकार समारंभ. सकाळी ११ : ४५ वाजता धर्मसभा, आभार व निरोप समारंभ

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles