28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

नाशिकरोड रत्न पुरस्कार जाहीर : स्व. भा. वी. जोशी, स्व.  सत्यभामा गाडेकर यांच्यासह बंटी भागवत, प्राचार्या प्रतिमा वाघ आदींचा समावेश

495 Post Views

नाशिक रोड : उमेश देशमुख

नाशिक रोड येथील सुप्रेम मेडिकल फाउंडेशन आणि रोटरी क्लब नाशिक सुप्रीम तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नाशिक रोड रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी दिली.

हा पुरस्कार सोहळा रविवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आर्टिलरी सेंटर रोडवरील माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राहुल ढिकले तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे जिल्हा गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित राहणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, वैद्यकीय, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या स्वर्गीय प्रा. भालचंद्र जोशी यांना मरणोत्तर ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. तसेच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुनील ढगे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. पूनमचंद ठोळे, उत्कृष्ट संस्थेच्या श्रेणीत इंडिया सिक्युरिटी फ्रेश एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पत्रकारितेसाठी मनोज मालपाणी, सामाजिक कार्यासाठी विकास (बंटी) भागवत, प्रशासकीय क्षेत्रासाठी संजय कटाळे आणि राजकीय कार्यासाठी स्वर्गीय सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांना मरणोत्तर ‘नाशिक रोड रत्न पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

याशिवाय विशेष सन्मान म्हणून श्रीपाद बाजपे यांचा गौरव करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक रत्न पुरस्कारासाठी डॉ. बाळकृष्ण शेलार, डॉ. चित्रा लालवाणी, डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. प्रतिभा वाघ आणि किसनराव निकम यांची निवड करण्यात आली आहे.

या सर्व सन्मानासाठी सुप्रेम फाउंडेशनने मागवलेल्या प्रस्तावांची निवड समितीमार्फत छाननी करून अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुषमा भुतडा, डॉ. सुशील पारख, अचल राजे आणि डॉ. रेशमा घोडेराव यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles