28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सौर प्रचार रथाला प्रारंभ

185 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

१७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या सेवा पर्व कालावधीत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.   त्यानुसार नाशिक जिल्ह्यात महावितरण व प्रीत चॅरिटेबल संस्थेच्या सौजन्याने योजनेची थेट जागृती करण्यासाठी सौर प्रचार रथ तयार करण्यात आलेला आहे. “सोलरपे चर्चा” करीत मार्गक्रमण करणाऱ्या सूर्यघर योजनेच्या या सौर रथाला विद्युत भवन येथे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी आज मंगळवार (दि. २३) रोजी हिरवी झेंडी दाखवीत  जनजागृतीला प्रारंभ केला.

या रथाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता, राजेश थुल, सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंते चेतन वाडे, जगदीश जाधव, अनिल झटकारे, नंदकिशोर काळे, व्यवस्थापक हेमंत भामरे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी तसेच प्रीत चॅरिटेबल  संस्थेचे डॉ. शरद बोडके, शशिकांत बोडके यांचेसह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

” प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत महावितरणच्या नाशिक परिमंडळातील २५ हजार ३४३ ग्राहकांनी लाभ घेत आपल्या छतावर ५८.२५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे. सेवापर्वात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत असून या  योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.” 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles