तीस टक्के लोकांना स्क्रीनमुळे चष्मा लागून नंबर वाढतो. ८० टक्के लोकांना टीव्ही, आयपॅड, मोबाईल स्क्रिनमुळे डोळ्यांवर ताण येत असतो. त्यामुळे चष्मा लागून सतत नंबर वाढत असल्याचे निदर्शनास येत असून पालकांनी लहान मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवावे.असे आवाहन नेत्रतज्ञ डॉ. शुभांगी पिंपळकर यांनी केले.
२४ तासांमधील ३० मिनिट हा योग्य स्क्रीन टाईम आहे. स्क्रीनवर काम करणा-यांनी वीस मिनिटांचा ब्रेक घ्यावा, भरपूर पाणी प्यावे. १४ ते १६ सेकंदाने पापण्या उघडझाप होतात.स्क्रीन टाईममुळे हा वेळ २० सेकंदांपर्यंत गेला आहे. महिलांमध्ये थायरॉईड व पीसीओडी मुळेही चष्मा लागण्याचे प्रमाण वाढते आहे. येथील सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनमध्ये डॉ. मो. स. गोसावी यांच्या ९० व्या जयंती व अभियंता दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रकल्प संचालक प्रा. प्रदीप देशपांडे, प्राचार्या डॉ. श्रद्धा देशपांडे यांनी मो. स. गोसावी यांच्या कार्याचा परिचय करून दिला. डॉ. अग्रवाल नेत्र रुग्णालय आणि सुशील आय केअरतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. चारशे शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रा. प्राजक्ता साखरे यांनी सूत्रसंचालन केले.