मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने नाशिकरोड व परिसरात शुक्रवारी ( दि.५ ) मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.जुलूस अर्थात मिरवणुकीत सहभागी मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले. मुस्लिम धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने मुस्लिम बांधवातर्फे ईद ए मिलाद सण साजरा केला जातो.
मिरवणूक मार्गावर अनेक राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांच्या वतीने मिरवणुकीत सामील झालेल्या चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. ईद ए मिलाद निमित गोसावी वाडी,सुभाष रोड येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बिटको पॉईंट,मुक्तीधाम मार्गे,अनुराधा चौक,सत्कार पॉईंट, देवळालीगाव,विहितगाव मार्गे देवळाली गावात असलेल्या गाडेकर मैदानावर मिरवणुकीची सांगता झाली.यावेळी मौलाना अब्दुल बारी यांचे प्रवचन झाले. देशात अमन आणि शांतता रहावी याकरिता विशेष प्रार्थना पार पडली. मिरवणुकीत सामील झालेल्या समाजबांधवांसाठी अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाजी इम्तियाज सय्यद यांच्यासह अनेक मौलाना उपस्थित होते.
सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम मिरवणुकीत झाला नाही. भर पावसात उत्साह कायम होता. मित्रमेळा संघटना,राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,रेल्वे स्टेशन रिक्षा चालक मालकसंघटना,शिवसेना शिंदे गट,शिवसेना ठाकरे गट, रिपाइं आठवले गट,पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदींसह विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीने चित्ररखांचे स्वागत करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधवांना नानकटाई,पिण्याचे पाणी,सरबत वाटप करण्यात आले.
यावेळी हिंद सोशल ऑर्गनायझेशनचे संस्थापक निजाम मास्टर,आरिफ शेख,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गजानन शेलार, मुन्ना अन्सारी, राजाभाऊ पवार,अल्ताफ सय्यद,अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे,मनोहर कोरडे,मंगेश लांडगे,शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अस्लम मणियार,योगेश गाडेकर,मसूद जिलानी, मित्रमेळा संघटनेचे संस्थापक राजेंद्र ताजने,किरण डहाळे, नय्युम खान,काँग्रेसचे दिनेश निकाळे, कामिल इनामदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू लवटे,माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे,पीपल्स रिपाईचे नेते गणेश उन्हवणे,शशिकांत उन्हवणे,आठवले गटाचे समीर शेख,नयना वाघ,किशोर खताळे,सागर निकाळे, शाम गोहाड, अतुल धोंगडे,निर्मल भंडारी आदी उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत सहभागी झालेले मंडळ हिंद सोशल ग्रुप, गोसावी वाडी, चिस्तिया फ्रेंड सर्कल,देवळाली गाव, चांद तारा फ्रेंड सर्कल, चेहडी, चिस्तिया फाउंडेशन, सादिक हुसैन ग्रुप,सिन्नर फाटा, जमजम फाउंडेशन जेलरोड,गुलाम ए नबी ग्रुप जेलरोड,रिझवी सोशल ग्रुप रोकडोबावाडी,अंजुमन मोहम्मदिया ग्रुप देवळाली गाव, उम्मत फाउंडेशन बागुल नगर,विहितगाव, हुसैनी फ्रेंड सर्कल विहितगाव आदी मंडळे सहभागी झाली होते.