राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली वाढदिवस साजरा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या उपस्थितीत केक कापून महाले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ म्हणाले की, त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार हिरामण खोसकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला. यामध्ये सामान्य जनतेप्रमाणेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील मोठे योगदान आहे. त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी निवडणूक दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक काम केले. हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले. राष्ट्रवादीचा प्रचार करीत पक्षाचे नाव, ध्येय,धोरण घरोघरी पोहोचवण्यामध्ये हातभार लावल्याचे सांगितले.
आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, इगतपुरी मतदार संघामध्ये मागील पाच वर्षात अनेक विकासकामे केली आहे. यामध्ये काही कामे अद्याप बाकी आहे. येणाऱ्या पाच वर्षात इगतपुरी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहील. असे सांगून इगतपुरी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा सत्कार केला. त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी मनोगत व्यक्त करताना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी संपत सकाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.