22.5 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

माजी नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा अनिल भालेराव यांचा “वडनेर भैरव भूषण पुरस्कार” ने सन्मान ; भरीव योगदानामुळे गौरव

428 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

शहरातील माजी नगरसेविका डॉ. वर्षा अनिल भालेराव यांचा वडनेर भैरव भूषण पुरस्कार देऊन नुकताच सन्मान झाला. वडनेर भैरव फेस्टिवल समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना स्मृतीचिन्ह,प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

नाशिक महानगरपालिकेत मागच्या सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या प्रा.डॉ.वर्षां अनिल भालेराव यांनी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांनी केलेल्या सर्वांगीण कार्याची दखल घेत वडनेर भैरव फेस्टिवल समितीने त्यांना “वडनेर भैरव भूषण पुरस्काराने” सन्मानित केले. दरम्यान माजी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायन्स विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

यापूर्वी विविध संस्थांचे पुरस्कार

माजी नगरसेविका प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांना यापूर्वी अनेक संस्थानी गौरविलेले आहे. यात प्रामुख्याने नाशिक सिटीझन फोरम च्या वतीने विशेष कार्य पुरस्कार,लायन्स क्लब च्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार, संत गाडगेबाबा पतसंस्थेच्या वतीने कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर नाशिक भूषण पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार, सहजयोग परिवाराच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार,अखिल भारतीय पत्रकार संस्थेच्या वतीने आदर्श नगरसेविका पुरस्कार, वीरांगना पुरस्कार आदी आधी पुरस्कारांचा समावेश आहे.

नगरसेविका म्हणून बजावलेली जबाबदारी

एक लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना त्यांनी नाशिक महानगरामध्ये एस. टी. महामंडळाने शहर बस सेवेची संख्या कमी केली. सेवा सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली. याविषयी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये नाशिक मनपाच्या महासभेत प्रश्न उपस्थित करीत या विषयाला चालना दिली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीष महाजन व महाराष्ट शासन, एस. टी.महामंडळ,नाशिक मनपा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नाशिक शहर बस सेवेची नितांत असलेली गरज निदर्शनास आणून दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील सिटीलिंक शहर बस सेवेचा शुभारंभ नाशिक महानगरात झाला. या कार्यक्रमात नगरसेविका प्रा.डॉ.वर्षां भालेराव यांना देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते बस सेवेच्या अविरत पाठपुराव्या बद्दल गौरविण्यात आले. सिटीलिंक बस सेवेला अल्पावधीतच केंद्र शासनाचा उत्कृष्ट बस सेवेचा पुरस्कार मिळाला.

प्रभागात केलेली कामे

प्रभागामध्ये अद्यावत अशी मनपाची शाळा, भव्य दिव्य सुसज्ज क्रीडांगण, महिलांसाठी ग्रीन जिम, स्वच्छ व पुरेसे पाणी यासारख्या विषयांचा यशस्वी पाठपुरावा केला.
कोरोना काळात सातपूर विभागात आर.टी.पी.सी.आर. चाचण्या सुरू करणे, चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळणे, लसीकरणाचे केंद्र सुरू करणे, सातपूरला मनपाचे कोरोना सेंटर सुरू करणे,यासाठी त्यानी सर्वप्रथम पुढाकार घेतला.आणि या सर्व उपाय योजनांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी वृत्तपत्र, सोशल मीडिया यांचा त्यांनी प्रभावीपणे वापर केला. प्रशासनालाही सूचना केल्या.
अनेक मित्र मंडळींच्या व संस्थांच्या माध्यमातून कुठलाही गाजावाजा न करता शक्य ती मदत त्यांनी नागरिकांना केली.
सप्टेंबर २०२० मध्ये स्थायी समितीच्या सभेत त्यांनी सर्वप्रथम रेमडेसिव्हीर इंजेक्शन संदर्भात आवाज उठविला. इंजेक्शनचा भविष्यात काळाबाजार होऊ शकतो, हे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. म्यूकरमायकोसीस इंजेक्शन साठी त्यांनी केंद्रीयनमंत्री नितीन गडकरी यांनाच पाठपुरावा केला होता. तर शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला कांदा निर्यात बंदी उठवावी म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्रव्यवहार करून साकडे घातले होते.

महिलांसाठी विशेष कामे

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी online प्रशिक्षण घेतले. तर नाशिक जिल्ह्यातील UPSC आणि MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्यांचा त्यांनी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार केला. दिव्यांगासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात व त्यामुळे राष्ट्रीय दृष्टीहीन संस्थेच्या वतीनेही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles