जय बजरंग मित्र मंडळातर्फे रविवारी ( दि. १५ ) सिन्नर तालुक्यातील मोह येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आडगाव येथील शिवशक्ती क्रीडा मंडळाचा संघ अजिंक्य ठरला. मान्यवरांच्या हस्ते एकवीस हजार रुपये रोख आणि चषक देऊन विजेत्या संघातील सदस्यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेत छत्तीस संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना शिवशक्ती आणि श्रीसाई संघ सिडको यांच्यात झाला. त्यामध्ये शिवशक्ती संघ विजयी ठरला. शिवशक्ती क्रीडा मंडळ अजिंक्य मंडळातील खेळाडू प्रसाद मते स्पर्धेतील सर्वोत्तम चढाई पट्टू तसेच सचिन देशमुख सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला. मंडळातील खेळाडू शशिकांत बारकंङ, वैभव मते,कर्णधार स्वप्निल जाधव यांच्या आकर्षक चढाई तसेच हरी रिकामे, शेखर मते ,अमित ईंगळे ऋषिकेश देशमुख, प्रथमेश माळोदे पार्थ गायकवाड प्रशिक जाधव यांच्या आकर्षक क्षेत्ररक्षणा च्या जोरावर अजिंक्यपद पटकवले. विजयाबद्दल मंडळाचे कोच संतोष मते, सचिन मते दादासाहेब देशमुख यांचे मंडळाचे अध्यक्ष श्री. मेघनाथ माळोदे सचिव सुरेश शिदे तसेच आडगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.