1,249 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार योगेश घोलप यांच्या संदर्भातील सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालेला दिसतो. व्हायरल व्हिडिओ मुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये नेमके काय म्हटलेले आहे. याविषयी मतदारसंघात उत्सुकता सुरू आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार योगेश घोलप आहेत. घोलप आणि त्यांच्या समर्थकांनी मागील काही दिवसांपासून संपूर्ण मतदारसंघातून काढलेला आहे. योगेश घोलप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस तसेच त्यांच्या मित्र पक्षांचा समावेश आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये कोण कुणाच्या बाजूने आहे. आणि कुणाच्या विरोधात आहे. याविषयी देवळाली मतदारसंघात प्रचंड अस्वस्थतेचे आणि संभ्रमात टाकणारे वातावरण आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांच्या नावाने खासदार सुप्रिया सुळे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना केले आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असल्याचे सर्वश्रुत आहे. तसेच त्या खासदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा सक्रिय राजकारणात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे खासदार सुळे यांनी योगेश घोलप यांच्या बाबत केलेल्या आवाहनास महत्त्व प्राप्त झाले आहे. खासदार सुप्रिया यांच्या आवाहनामुळे घोलप समर्थकांमध्ये उत्साह आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आवाहनामुळे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आपल्या घोलप यांना मतदान करेल,असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.



