631 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांना नाशिक रोड परिसरातील दोन बालमित्रांनी पत्राद्वारे विजयाच्या शुभेच्छा दिल्या. बालमित्रांच्या शुभेच्छा पत्रात व्यक्त केलेल्या भावना मतदारसंघात चर्चेचा विषय आहे. पत्रातील भावनेमुळे आपण सुरू केलेल्या उपक्रमाचे आज फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया आमदार अँड राहुल ढिकले यांनी दिली.
अँड राहुल ढिकले आमदार नसताना त्यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या जन्मतारखा संग्रहित केल्या. कुटुंबातील वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुली व मुले यांना सर्वांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा पत्र पाठविण्याचा उपक्रम सुरू केला. सोबत लहान मुलांना आणि महिलांना छोटीशी पर्स, स्टीलचे छोटे भांडे अशी भेटवस्तू देखील दिली. आजही हा उपक्रम सुरूच आहे. आपल्याला अचानक मिळणारे शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू मुळे आज आपला सरप्राईज वाढदिवस पार पडला.अशी भावना मनात निर्माण होऊ लागली.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय