749 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी ( दि.८ ) नाशिक येथे प्रचार सभा पार पडली. सभेमुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या समर्थकांसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे शुक्रवारी जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. सभेला प्रचंड गर्दी होती. गर्दीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणदिसून येत होते.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार अँड राहुल ढिकले यांच्या समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. कोणत्याही परिस्थितीत आमदार अँड राहुल ढिकले पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे. मोदी यांच्या सभेमुळे आमदार अँड ढिकले यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाला. अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा केली जात आहे.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी एस.सी. बँक्वेट मंगल कार्यालय