22.5 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना देवळाली मतदार संघाचे मतदार पुन्हा विधानसभेत पाठविणार !; वैभव पाळदे यांचा दावा

648 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळाली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना मतदार निश्चितपणे निवडून देतील, तसेच पुन्हा एकदा विधानसभेत देवळालीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवळाली विभागाचे संघटक वैभव पाळदे यांनी केला.

देवळाली विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. पाच वर्षाचा अपवाद वगळता येथे कायम शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील मतदार शिवसेनेच्या विचारसरणीला मानणारा आहे. त्यामुळे योगेश घोलप यांना निवडणुकीत विजयी होण्यास खूप काही अडचण निर्माण होणार नाही. मतदार संघातील दौऱ्यात घोलप यांना मिळणारा प्रतिसाद बघता त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे २०२४ ते २०२९ दरम्यान देवळालीचे मतदार योगेश घोलप यांना विधानसभेत नक्की पाठवतील. असा विश्वास वैभव पाळदे व्यक्त करताना दिसतात.

नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट संजीवनी लॉन्स

विरोधी पक्षात असताना विकास कामे

देवळाली विधानसभा मतदारसंघात मतदारांनी घोलप कुटुंबाला सलग तीस वर्ष विधानसभेत पाठविले. यादरम्यान पाच वर्षाचा अपवाद वगळला तर उर्वरित वर्ष ही विरोधी पक्षाचा आमदार अशी परिस्थिती होती. मात्र तरीही त्यांनी कौशल्याने मतदार संघात निधी आणून विविध विकास कामे केली. त्याची जाणीव मतदार राजाला आहे. या वेळेला मतदार पुन्हा एकदा योगेश घोलप यांना विधानसभेत पाठवतील, असे वैभव पाळदे यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles