510 Post Views
नाशिक, प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाची शालार्थ वेबसाईट काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडली आहे. तर सेवकांची ऑनलाईन थकीत देयके सादर करण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर दिली आहे. त्यामुळे सलग तिन दिवस सुटटी असूनही संबधित सेवकांनी शाळा, महाविद्यालयात हजेरी लावली. पण शालार्थची वेबसाईट बंद असल्याने सेवकांना मनस्थाप सोसावा लागतो आहे. यामुळे थकीत देय बिलांची ऑनलाईन कामे खोळंबलेली दिसून येत आहे.
शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या माध्यमिक विभागाने दिनांक १२ सप्टेंबर रोजी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, मनपा व सैनिकी शाळा, अध्यापन विद्यालये, सराव पाठशाळा, जिल्हा नाशिक मुख्यादयापक व प्राचार्य यांच्या नावाने एक परित्रक काढले. परिपत्रकात थकीत पूरवणी बिल देयके दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन सादर करणे आवश्यक असल्याचा म्हटले आहे.

त्यामुळे संबधित सेवकांनी रविवार व रमजान ईदची सुटटी असून देखील कार्यालयात हजेरी लावली. शालार्थची ऑनलाईन वेबसाईट बंद पडल्याने थकीत देयकांचे ऑनलाईन पध्दतीचे कामे खोळंबलेली आहे. एकीकडे १८ सप्टेंबरची शेवटची मुदत तर दूसरीकडे बंद पडलेली शालार्थ वेबसाईट यामुळे ठराविक मुदतीत कामे होतील की नाही, असा प्रश्न देयकांची कामे करणारे सेवक आणि थकीत देयके धारक असणा-या शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांपुढे निर्माण होतांना दिसतो आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी सलग तिन दिवस जोडून सुटटी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना आहे. सुटटी असतांनाही कार्यालयात हजर राहून ऑनलाईन देयकाची कामे संबधित सेवकांकडून केली जात आहे. पण शालार्थ वेवसाईटच बंद पडल्याने ऑनलाईन कामे कशी करणार असा प्रश्न या सेवकांपुढे उपस्थित होतो आहे. या समस्याविषयी दाद कुणाकडे मागावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे. शासनाने एक तर बंद असणारी शालार्थ वेबसाईट तातडीने सुरु करावी, अन्यथा थकीत वेतन देयके सादर करण्याच्या कामकाजासाठी मुदतवाढ द्यावी, अशी चर्चा शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर होतांना दिसत आहे.



