18.4 C
Nashik
Tuesday, November 17, 2026
spot_img

महावितरण भरतीच्या नावाखाली फसवणुकीचा सापळा! २३ हजार पदांची थेट भरती असल्याच्या जाहिराती बनावट

144 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

महावितरणमध्ये तब्बल २३ हजारांवर विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती असल्याचे सांगत हजारो रुपयांच्या वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र या सर्व जाहिराती किंवा माहिती दिशाभूल करणारी असून त्याचा महावितरणशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नाहीत, अशा कोणत्याही बनावट जाहिरातींबाबत उमेदवारांनी सावध राहावे. सर्व पदांच्या भरती प्रक्रियेबाबतची कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा वेळोवेळी दिली जाणारी माहिती ही केवळ महावितरणच्याच www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांनी महावितरणमधील कर्मचारी भऱतीबाबत कोणतीही माहिती किंवा जाहिरातीबाबत अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यासोबतच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक देखील महावितरणच्याच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे उमेदवारांनी फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून प्राप्त झालेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या व चुकीच्या माहितीवर उमेदवारांनी किंवा नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles