24.1 C
Nashik
Wednesday, October 7, 2026
spot_img

ब्युटी पार्लच्या कामाच्या पैशावरून उपनगरला दोन महिलांमध्ये वाद 

185 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

विवाहिता व तिच्या आईला वारंवार दमदाटी व शिवीगाळ करणा-या महिलेने ओळखीच्या दोघांच्या मदतीने पुन्हा घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरातील विवाहितेकडे पाच महिन्यापूर्वी छाया शामराव गांगुर्डे (सिंधी कालनी, उपनगर) ही ब्युटीपार्लरच्या कामासाठी जात होती. विवाहितेची आई चालवत असलेल्या मेसमधून अधूनमधून जेवण घेऊन जात होती. पार्लरचे पैसे बाकी असल्याने विवाहितेने छाया गांगुर्डे हिला पैसे बाकी असल्याबाबत सांगितले. पाच महिन्यापासून गांगुर्डे ही सतत दमदाटी व शिवीगाळ करत होती.

गेल्या रविवारी दुपारी दोनला विवाहिता घरी एकटी असताना संशयित छाया गांगुर्डे घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागली. गांगुर्डेच्या ओळखीचे संतोष रणनवरे व त्यांचा मुलगा गौरव रणनवरे यांनी विवाहितेला शिवीगाळ करून दमदाटी केली. गौरवने दुचाकी जोरात चालवत विवाहितेच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बाहेर भेटा, तुमचा गेमच करतो, असे म्हणून शिवीगाळ केली. विवाहिता ही थोड्या वेळाने घराबाहेर सुकविण्यास टाकलेले कपडे काढत असताना संतोष रणनवरे हा आपला शर्ट काढून विवाहितेचा हात पकडून अश्लिल भाषेत बोलू लागला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles