25.2 C
Nashik
Saturday, June 20, 2026
spot_img

नाशिक शहरात शनिवारी या भागात राहणार बत्ती गुल

215 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक शहरातील विविध भागातशनिवारी ( दि.२० )विद्युत वाहिनीच्या देखभालीचे तसेच दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत शहरातील काही भागात वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.दरम्यान काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. या भागातील संबंधित वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे.असे आवाहन महावितरणच्या  नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

जेलरोडच्या या भागात वीज पुरवठा बंद

११ कें.व्ही.  राहुलनगर वाहिनी अंतर्गत येणारा
राहुलनगर, दामोधर नगर, केरु पाटील नगर, सिद्धाई नगर, मोरे मळा,  पवारवाडी, भैरवनाथ नगर, भारत भूषण, वाघेश्वरी, विमलनगर, प्रगतीनगर, ब्रीजनगर  व परिसर.

११ केंव्ही सायट्रिक  वाहिनी अनर्गत येणारा एकदंत  अपार्टमेंट, द्वारकानगर, एकतानगर,  हरीकूलनगर, संभाजीनगर, सद्गुरू नगर,  आयोध्यानगर, गुरुअमृतनगर, शनिमंदिर परिसर, सरस्वतीनगर श्रीकृष्ण नगर व परिसर.

कॉलेजरोड परिसरातील या भागाचा समावेश

३३ केव्ही गंगापूर विद्युत वाहिनी अंतर्गत येणारा
कॉलेज रोड, शिर्के मळा, बीवायके कॉलेज, कृषी नगर, सायकल सर्कल परिसर, पारिजात नगर, पी अँड टी कॉलनी, कॅनडा कॉर्नर व परिसर.

उपनगर विद्युत उपकेंद्रात एक तास बंद

उपनगर विद्युत उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगर विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व विद्युत वाहिनीवरील वीजपुरवठा सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत एक तास बंद राहील.
यामध्ये डीजीपी नगर, समता नगर, गांधी नगर, इच्छामनी, नाशिक रोड आणि आर्टिलरी या ११ केव्ही विद्युत वाहिनीवरील भागाचा समावेश आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles