17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

प्रभाग १७ मध्ये शिंदे गटाचे राजेश आढाव, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे यांची प्रचारात आघाडी ! ; जनतेच्या प्रतिसादामुळे वाढला विजयाचा आत्मविश्वास

228 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

प्रभाग १७ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर आहे. संपूर्ण प्रभाग पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतलेली दिसते. यावेळी मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांचा विजयाचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. प्रचाराच्या झंझावाताची दखल घेण्यास त्यांनी विरोधकांना भाग पाडल्याचे त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा केली जाते आहे.

प्रभाग १७ मधून राजेश आढाव, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या पॅनलची निर्मिती विरोधक आणि जनता जनार्दनासाठी आश्चर्याचा मोठा धक्का मानला जातो. कुणाच्या ध्यानी मनी नसताना शिवसेना शिंदे गटाचा प्रबळ पॅनल प्रभागात उभा राहिला. अगदी सुरुवातीच्या काळापासून शिंदे गटाने प्रचारात आघाडी घेतलेली दिसते. त्यांना जनतेचा पाठिंबा आणि प्रतिसाद देखील उत्तम प्रकारे मिळतो आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांसह समर्थकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे. सुरुवातीला विरोधकांकडून या पॅनलच्या उमेदवारांकडून दुर्लक्ष केले जात होते. सध्याच्या घडीला शिंदे गटाच्या प्रभाग १७ मधील सर्वच उमेदवारांचा विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्याच्या घडीला विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून शिंदे गटाचे उमेदवार मानले जात आहे.

सुसंस्कृत उमेदवार जमेची बाजू !

प्रभाग १७ मधील शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेश आढाव, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे राजकीय दृष्ट्या सुसंकृत उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यांच्या प्रचाराची आणि जनतेसोबत संवाद साधण्याची पद्धत लक्षवेधक ठरताना दिसते. प्रभाग १७ मधील जनता जनार्दन सूज्ञ आणि चणाक्ष आहे. प्रभागात विकास कामे आणि मूलभूत सुविधा पुरविण्याची ताकद केवळ शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभी राहील. आणि आम्हालाचा विजयी करणार असा आत्मविश्वास शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेश आढाव, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे यांनी व्यक्त केला आहे.

जेवढे शक्य तेवढेच आश्वासने !

शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेश आढाव, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे यांच्याकडून प्रभागातील जनतेला विनाकारण चुकीचे आणि खोटी आश्वासने दिली जात नाही. जे कामे करणे शक्य आहे. केंद्र आणि राज्यसरकार ज्या कामांना मंजुरी देऊ शकते.आणि नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात निश्चित केलेली कामांची केवळ आश्वासने दिली जात आहे. प्रसिद्धी आणि खोटी आश्वासने देऊन आम्ही जनतेची दिशाभूल करू इच्छित नाही. करू शकतो तेवढ्याच कामांचे आम्ही आश्वासने देत आहोत असे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राजेश आढाव, विजयता डावरे, सुशीला लोखंडे, राहुल कोथमिरे सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles