28.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

कायद्याचा बालेकिल्ल्यात नाशिकरोडच्या ऑनलाइन बिंगो गेमची चर्चा जोरात !

595 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक मधील गुन्हेगारी जगताने सद्या एकच धसका घेतलेला दिसतो. तो म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या वाक्याचा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा. गुन्हेगारी जगताकडून त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे अगदी मनापासून स्वागत केले आहे.आपल्याला अटक होऊन आपलाही व्हिडीओ व्हायरल होऊ नये, या भितीपोटी अनेक धंदेवाईक आणि सराईत गुन्हेगारांनी नाशिकच्या बाहेर पळ काढलेला दिसतो. मात्र या सर्व कारवाईच्या धामधुमी दरम्यान नाशिकरोड व जेलरोड परिसरात ऑनलाईन बिंगो रोलट जुगाराचा गेम जोरात असल्याची चर्चा आहे.

शहर पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या उपक्रमाने नाशिक शहरातील गुन्हेगारांच्या साम्राज्यात खळबळ आणि पोलिसांची दहशत निर्माण झालेली आहे. शहरात गुन्हेगारीच्या क्षेत्रा ऐवजी आता रामराज्य निर्माण होत असल्याची भावना नाशिक करांच्या मनात निर्माण होतांना दिसत आहे. याप्रमाणे कायमस्वरुपी कारवाई सुरू ठेवावी. अशी अपेक्षा देखिल सामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाशिकरोड आणि जेलरोड परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो रोलट गेमच्या चर्चेची शहानिशा पोलिसांनी करावी. त्यात खरोखरच तथ्य असेल तर संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी इतरांप्रमाणे कारवाई करावी.अशी मागणी दबक्या आवाजात केली जात आहे.

कुलवंत कुमार सारंगल आणि कर्णिक यांची तुलना

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या उपक्रमामुळे शहर पोलिस आयुक्त संदिप कर्णिक जिल्हाभरात चर्चेत आलेले आहेत. पोलिसांची ताकद काय असते हे आयुक्त कर्णिक यांनी दाखवून दिले. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झालेला आहे.  कर्णिक यांनी गुन्हेगारांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाई मुळे नाशिकचे माजी पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सारंगल यांच्या सोबत त्यांची तुलना केली जात आहे. सारंगल यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना पळता भुई थोडी अशी अवस्था केली होती. नाशिकमध्ये त्यांचा कार्यकाळ गाजलेला होता. त्यांच्या बदलीचा विरोध दर्शविण्यासाठी सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती. त्याच प्रमाणे आयुक्त संदिप कर्णिक यांची तुलना केली जात आहे.खरोखरच कर्णिक यांनी गुन्हेगारांच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेचे स्वागत करावे तितके कमी आहे.

रिअल मनी गेमिंग वर प्रतिबंध

केंद्र सरकारने ‘रिअल मनी गेमिंग’ अर्थात ऑनलाइन खेळांच्या जुगारावर संपूर्ण प्रतिबंध आणणारे विधेयक मंजूर केले आहे. देशातील आघाडीच्या कंपन्यांनी मोबाइल गेमिंग ॲप बंद केल्याचे जाहीर केले आहे. ऑनलाइन गेमिंग मंच असलेल्या विन्झो आणि नझारा टेक्नॉलॉजीजच्या मूनशाईन टेक्नॉलॉजीजने पोकरबाजीसारखे मोबाइल गेमिंग ॲप बंद केले आहे.

केंद्राचे कोट्यवधींच्या महसुला पेक्षा समाज कल्याणाला प्राधान्य

ऑनलाईन गेमिंग उद्योग क्षेत्रातून मिळणाऱ्या महसुला पैकी एक तृतीयांश उत्पन्न हे ऑनलाइन रिअल मनी गेमिंगद्वारे प्राप्त होते.केंद्र सरकारने महसुलापेक्षा समाज कल्याणाला अधिक महत्त्व दिले. वर्ष २०२९ पर्यंत ९.१ अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचा अंदाज असलेल्या क्षेत्राचे भविष्य आता धोक्यात आले आहे गेमिंग रिपोर्ट २०२५ नुसार, जगातील गेमिंग वापरकर्त्यांच्या संख्येपैकी भारताचा वाटा सुमारे २० टक्के आहे.भारतात जागतिक गेमिंग ॲप डाउनलोडमध्ये १५.१ टक्के आहे.वर्ष २०२४ मध्ये ३.७ अब्ज डॉलर मूल्याचे देशांतर्गत गेमिंग क्षेत्र २०२९ पर्यंत ९.१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.गेल्या पाच वर्षांत, देशाने जवळजवळ ३ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. आणि १,८०० हून अधिक गेमिंग स्टार्टअप्स अर्थात नवउद्यमींचे घर आहे. ऑनलाइन कौशल्य गेमिंग क्षेत्र हा एक उदयोन्मुख उद्योग आहे, ज्याचे मूल्यांकन २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि वार्षिक महसूल ३१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles