रेल्वे प्रवाशांसाठी सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करणारे रेलवन अॅप आता अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएसवर उपलब्ध झाले आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक अभिनव आणि सर्वसमावेशक मोबाईल अॅप “रेलवन (RailOne)” ॲप लाँच केले आहे. हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
हे अॅप प्रवाशांसाठी एक वन-स्टॉप सोल्युशन आहे. या अॅपद्वारे तिकीट सेवा ज्यामध्ये आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, पीएनआर व ट्रेन चौकशी, यात्रा नियोजन, रेल मदत सेवा, ट्रेनमधील भोजन बुकिंग आणिमालवाहतूक (फ्रेट) संबंधित चौकशी सेवा वापरणे शक्य आहे. आधुनिक आणि स्पष्ट युजर इंटरफेसमुळे सर्व सेवा सहज उपलब्ध होतात. विविध सेवांमध्ये सुसंगतता असल्यामुळे युजरला एकत्रित अनुभव मिळतो आणि वेगवेगळ्या अॅप्सची गरज राहत नाही.
विशेष वैशिष्ट्य : सिंगल साइन-ऑन
रेलवन अॅपमध्ये सिंगल साइन-ऑन फीचरद्वारे, वापरकर्ते रेल कनेक्ट किंवा युटीएस ऑन मोबईल अॅपमधील आपल्या विद्यमान यूजर आयडीचा वापर करून लॉगिन करू शकतात. यामुळे अनेक अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज राहत नाही आणि मोबाईल स्टोरेज देखील वाचते. आर-वॉलेटरेलवन अॅपमध्ये रेल्वे ई-वॉलेट सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तिकिट बुकिंग अधिक जलद व सोपे होते. या सोबतच, सांख्यिक एमपीन आणि बायोमेट्रिक लॉगिन यासारख्या सुरक्षित आणि सोप्या लॉगिन पर्यायांनी अॅपचा वापर अधिक सुलभ केला आहे.
नवीनसाठी जलद नोंदणी
नोंदणी प्रक्रिया कमीत कमी माहितीवर आधारित असून, ती अतिशय सोपी आणि झपाट्याने पूर्ण होते. केवळ चौकशी करणारे वापरकर्ते देखील गेस्ट लॉगिन वापरून, आपला मोबाईल क्रमांक व ओटीपीच्या सहाय्याने लॉगिन करू शकतात.