17.7 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या मेळाव्यात पंधरा तांत्रिक सभासदांचा प्रवेश

228 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

येथील नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा बुधवारी ( दि. ३ ) मंजुळा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्याचे अध्यक्ष संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री.भाऊसाहेब भाकरे पाटील होते. यावेळी इतर संघटनेतील पंधरा तांत्रिक सभासदांनी प्रवेश केला.

नाशिक झोन चे मुख्य अभियंता श्री.सुंदर लटपटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी संघटनेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस श्री.हाजी सय्यद जहीरोद्दीन यांनी तांत्रिक कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्यक्षात काम करतांना आपल्याला अनेक अडचणी येत असतात. त्या कशा पद्धतीने सोडविणे आवश्यक असून वीज अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जावी. याविषयी मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन अडचणी वरती तसेच संघटनेच्या वतीने तांत्रिक कामगारांचे प्रश्नांबाबत मुख्यालयास पत्र देऊन केलेला पाठपुरावा, संघटना व कंपनीच्या चालू घडामोडी संदर्भात भाष्य केले.मेळाव्यास नाशिक झोनचे ए.जी.एम. श्री. चंदकांत खाडे, उपमुख औद्योगिक संबंध अधिकारी श्री.राजेभोसले ,जनसंपर्क अधिकारी आडे तसेच संघटनेचे नाशिक जिल्ह्यातील प्रादेशिक, झोन, मंडळ, विभागीय पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

श्री. के. वाय. बगड यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय पदाधिकारी कार्यकारणीत श्री.के वाय. बगड यांची केंद्रीय उपसरचिटणीस पदावर निवड झाली. संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी तसेच नाशिक टीम तांत्रिक तर्फे श्री. बगड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles