जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचालित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शनिवारी ( दि. २३ ) इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सहात सहभाग नोंदवला.
कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन कामात सक्रिय विद्यार्थ्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती तयार केले.शाळेतील शिक्षिका स्नेहल दंडगव्हाळ यांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचा गणपती बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने मग अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर होता.इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांनी ज्या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. शाळेतील शिक्षिका सरिता उगले यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका सरला खैरनार व अंजली घोलप यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन केले.