23.3 C
Nashik
Saturday, July 5, 2025
spot_img

देवळाली गावात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते योगेश गाडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ; शिवसेनेच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद

546 Post Views

नाशिक रोड : उमेश देशमुख

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नाशिकरोड शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते योगेश गाडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यादरम्यान देवळाली गावात मोफत आरोग्य निदान शिबिर झाले. पाचशे नागरिकांनी लाभ घेतला. रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष  दत्ता गायकवाड यांनी शिबीराचे उदघाटन केले

सहसंपर्क प्रमुख  सुनील बागुल, माजी आमदार वसंत गिते,  योगेश घोलप,  शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, सागर भोजणे, माजी महापौर नयन घोलप,  सुनील बोराडे, भैय्या मनियार, राजेंद्र ताजणे,  सीमा ताजणे, भारती ताजनपुरे, सुनिता कोठुळे, योगिता देशमुख, स्वाती पाटील, मधु पाटील,  माधुरी पाटील, योगेश देशमुख, मसूद जिलानी, उत्तम कोठुळे, राहुल ताजणपुरे,  विजय जाधव, नितीन पाटील, विकास गीते, किरण डहाळे, सुनिल देवकर आदी उपस्थित होते. डॉ. कांचन लोकवाणी, डॉ. नितीन टिळे, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. दिप्ती पापरीकर, डॉ. कृष्णा गिरी, डॉ. किरण शिंदे, डॉ. अपूर्वा शिंदीकर, डॉ. रेश्मा घोडेराव आदींनी कर्करोग निदान, रक्तचाचणी, अस्थिरोग, हद्यरोग, दात, डोळे, कान, नाक, घसा तपासणी,  त्वचारोग, मधुमेघ आदी विकारांची तपासणी केली. रक्तदान  शिबिर झाले. स्वप्निल आवटे, सागर निकाळजे, शेखर पवार आदींनी संयोजन केले.

योगेश गाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 देवळाली गाव येथे हिंदुहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व  युवा नेते व नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश  गाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांचे हस्ते झाले. यावेळी यावेळी सहसंपर्क प्रमुख  सुनिल बागुल, व्यापारी बॅकेचे अध्यक्ष
दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते,  योगेश घोलप, पंच कमेटीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम, विशाल गाडेकर, जयश्री गाडकेर आदी उपस्थित होते.यावेळी खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की देवळालीगाव येथील शिवसेनेची  शाखा स्थापना स्व. बाळासासहेब ठाकरे यांचे उपस्थित झाली आहेत. या शाखाने अनेक शिवसैनिकांना घडविले आहेत. योगेश गाडेकर यांनी संपर्क कार्यालय सुरु केले आहेत. या कार्यालयातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविले जाईल.संयोजन स्वप्निल शहाणे, कृणाल शहाणे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles