राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी विक्रम कोठुळे व महिला आघाडीच्या प्रणाली कोठुळे यांनी तयार केलेल्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान प्रकाशन झाले.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी विक्रम कोठुळे व सहकारी यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सरोज अहिरे यांची भेट घेऊन नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिनदर्शिकेचे अवलोकन केल्यानंतर समाधान व्यक्त केले. दिनदर्शिकेमध्ये मराठीत सण-उत्सव, यात्रा उत्सव याची माहिती जनतेला महत्त्वाचे ठरेल, त्याचबरोबर घरोघरी दिनदर्शिका गेल्याने पक्षाचा प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी निवृत्ती अरिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जुल आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर
राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी आजवर अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे. कोरोना काळात त्यांनी गोरगरिबांची मदत केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. दिनदर्शिका २०२५ प्रकाशनाने कोठुळे यांच्या सामाजिक कार्यात निश्चित भर पडणार आहे.