नाशिक रोडच्या जयभवानी रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य तुळजा भवानी मंदिरात देवस्थानतर्फे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या मंदिराच्या नवरात्रोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असतानाही नवरात्रीत सुमारे चार लाखावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला. नवरात्रोत्सवात मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले होते.
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सहाणे, कार्याध्यक्ष किशोर जाचक, उपाध्यक्ष रमेश थोरात, सरचिटणीस सुभाष पाटोळे, खजिनदार राजेंद्र गायकवाड, पदाधिकारी कैलास कदम, रविंद्र गायकवाड, विश्वस्त दिनेश खांडरे, रुंजा पाटोळे, शिवाजी कदम, प्रमोद लोणकर, शिवाजी लवटे, बाळासाहेब गायकवाड, पोपट पाटोळे, दिलीप कदम, बाळासाहेब चव्हाण, अनिल शिरसाट, पोपट चव्हाण, किरण सहाणे, अरुण गायकवाड, पार्थ भागवत आदींनी संयोजन केले.
घटनास्थापना ३ ऑक्टोबरला झाल्यापासून दस-यापर्यंत म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. चरण तीर्थ पहाटे तीन वाजता तर अभिषेक, महापूजा पहाटे तीन ते साडेपाच दरम्यान झाली. पहाटे साडेपाचला महाआरती तर दुपारी बाराला देवीला मध्यान भोग अर्पण झाला. सायंकाळी आठला महाआरती झाली. प्रक्षाळ पूजा रात्री दहा ते साडेदहा दरम्यान तर नियमितपणे दुर्गा सप्तशती पाठ पठण दुपारी एक ते तीन दरम्यान झाले.
सायंकाळी देवीची मंचकी निद्रा, पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना व छबीना, देवीची नित्योपचार पूजा, ललिता पंचमी, रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापूजा झाली. ९ ऑक्टोबरला देवीची शेषशाही अलंकार महापूजा झाली. १० ऑक्टोबरला भवानी तलावर अलंकार महापूजा, ११ ऑक्टोबरला दुर्गाष्टमी व महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा, सकाळी होम हवन, दुपारी पूर्णाहुती झाले. १२ ऑक्टोबरला दुपारी धार्मिक विधी, विजया दशमी उत्सव, सिमोल्लंघन झाले. रात्री पालखीची मिरवणूक निघाली. १६ ऑक्टोबररला कोजागिरी पोर्णिमा उत्सव, १७ ऑक्टोबरला देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री छबीना व जोगवा,
१८ ऑक्टोबरला देवीची नित्योपचार पूजा, महाप्रसाद
मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. त्यासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी, देणगी द्यावी, कोजागिरी पोर्णिमेपर्यंतच्या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.