२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवळाली विधानसभा मतदार संघामधून लक्ष्मण मंडाले इच्छूक अन प्रबळ दावेदार होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी मंडाले यांना डावलत सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी नाकारल्याने मंडाले यांच्यावर अन्याय झाला. त्यांच्या निवडणूक पूर्वतयारीवर पाणी फिरले गेले. शरद पवार यांची मानसकन्या म्हणून पुढे आलेल्या आमदार अहिरे यांनी पवार यांच्यासोबतच गद्दारी केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गोटात त्या सामील झाल्या. येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा लक्ष्मण मंडाले इच्छुक आहे. मागच्या वेळेला उमेदवारी नाकारून अन्याय झालेल्या मंडाले यांना यावेळेस शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देऊन न्याय देईल का? असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये उमटताना दिसतो आहे.
देवळाली विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. यात लक्ष्मण मंडाले यांचे नाव आघाडीवर आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंडाले यांना डावलले. पण या वेळेला मंडाले यांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे. मागील एक ते दीड वर्षापासून मंडाले यांनी मतदारसंघ पिंजून काढला. गावोगावी जात मंडाले यांनी आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असल्याची छाप मतदारांवर पाडलेली दिसते. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेत मंडाले यांची प्रचारात आघाडी असल्याचे दिसून येते. मागच्या वेळेला झालेल्या अन्याय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावेळेला उमेदवारी देऊन दूर करेल, असा विश्वास मंडाले यांच्या समर्थकांना वाटतो आहे.
चूक झाली, माफी मागायला आलोय…
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. छगन भुजबळ अजित दादा पवार यांच्या गटात सामील झाले. त्यावेळेला शरद पवार यांनी येवल्यामध्ये मोठी जाहीर सभा घेतली. माझ्याकडून चूक झाली, त्याची माफी मागायला आलोय, असे विधान केले. ते विधान महाराष्ट्रभर गाजले. सद्या देवळालीत हेच विधान चर्चेत दिसत आहे .छगन भुजबळ यांच्याप्रमाणे बंडखोरी करणाऱ्या आमदार सरोज अहिरे यांना शरद पवार धडा शिकवतील, त्यांना जागा दाखवून देतील, त्यासाठी मंडाले हे सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे बोलले जात आहे.
दुसरा सक्षम उमेदवार आहे का ?
देवळाली विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना आव्हान उभा करील, असा उमेदवार नेमका कोण आहे. याविषयी राष्ट्रवादीत खलबते सुरू आहे. यात लक्ष्मण मंडाले यांच्या नावाचा सामावेश आहे.