Home Blog नाशिक पूर्व मतदार संघात अतुल मते यांची होर्डिंगबाजी ; शरद पवार यांच्या...

नाशिक पूर्व मतदार संघात अतुल मते यांची होर्डिंगबाजी ; शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीची चर्चा

0
1,325 Post Views

नाशिकरोड, उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल मते यांनी मध्यवर्ती चौकात मोठ मोठे होर्डिंग उभारलेले दिसतात. मते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यांनी उभारलेले होर्डिंग मतदार संघात चर्चेचा विषय ठरत आहे. मते यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसतात.

शहरी आणि ग्रामीण भाग अशी रचना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाची आहे. अतुल मते आडगाव येथील रहिवासी आहे. नाशिक तालुक्यात मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून आडगावची गणना होते. म्हसरूळ, मखमलाबाद, नांदूर – मानुर या गावांचा देखील मतदार संघात समावेश होतो. उर्वरित भाग शहरी आहे. शहर आणि ग्रामीण अश्या मतदार संघात आजवर शहरातील उमेदवारांना उमेदवारी दिली गेली.
ग्रामीण भागाकडे राजकीय पक्षांचे काहीसे दुर्लक्ष होत असल्याची खंत ग्रामीण भागात व्यक्त होतांना दिसते. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ग्रामीण भागातून अतुल मते यांचा चेहरा पुढे येत आहे. सुरुवातीला मते ग्रामीण भागातील असून त्यांचा शहरी भागात फारसा संपर्क नाही. असे बोलले जात होते. त्यास छेद देण्यासाठी मते यांनी नाशिक पूर्व मतदार संघामध्ये घरोघरी जाऊन थेट सामान्य नागरिकांसोबत संपर्क वाढविण्यावर भर दिला. मतदार संघामध्ये त्यांचा एक दौरा पूर्ण झाला असल्याचा दावा केला जातो आहे. त्याचप्रमाणे ठीक – ठिकाणी होर्डिंग उभारलेले जात आहे. सध्याच्या घडीला मतदारसंघात मते यांची होर्डिंगबाजी लक्षवेधक ठरत आहे. होर्डिंगबाजीमुळे मते यांच्या नावाची चर्चा सामान्य जनतेमध्ये सुरू झालेली दिसते.

हॉटेल जत्रा शिवारातील प्रसिध्द समृध्दी बिल्डकॉम 

उमेदवारीचे संधी मिळू शकते?

मते यांची मतदार संघात सर्वत्र चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक इच्छुक आहे. त्यामध्ये मते यांना उमेदवारी मिळणार की नाही ?, याविषयी जनता उत्सुकता आहे. ग्रामीण भागातील तरुण सुशिक्षित चेहरा असल्याने मते यांना निश्चित संधी मिळू शकते. असा एक मतप्रवाह मतदार संघात आहे.

प्रेस गेट समोरचे होर्डिंग चर्चेत

प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. मतदार संघात त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे. अतुल मते आणि गोडसे यांच्यात उमेदवारी साठी स्पर्धा होऊ शकते. त्यामुळे मते यांनी प्रेस गेट समोर उभारलेले होर्डिंग चर्चेत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version