1,014 Post Views
नाशिक : प्रतिनिधी
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सत्तेत असतांना राज्यात महिलांवर अत्याचार झाले नाहीत का?, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांना उपस्थित करून बदलापूर घटनेवर राजकारण करू नये, असे आवाहन केले . पण आमदार फरांदे यांनी अगोदर एम. डी. ड्रग प्रकरणात नाव पुढे आलेली बडी भाभी कोण याचे उत्तर द्यावे, असे प्रति आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष नितीन निगळ यांनी फरांदे यांना दिले.
याविषयी निगळ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, बदलापूर येथे दोन छोट्या चिमुरड्या मुलींवर झालेल्या बलात्काराचे खरंच भांडवल केल्या जातंय का? तर अजिबात नाही काही दिवसांपूर्वी डॉक्टर मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी महाराष्ट्राचे सरकार आवाज उठवू शकतं , न्यायासाठी आंदोलन करू शकतं मग महाराष्ट्रात सर्व अधिकार त्यांच्या हातात असताना इथल्या गुन्हेगाराला शिक्षा का देऊ शकत नाही.
जत्रा हॉटेल शिवारात स्वप्नातील घरांसाठी विश्वासपात्र एकमेव समृद्धी बिल्डकॉम
