Home Blog एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या भारतीय जवानांसाठी “राख्या” ; जेसीआय नाशिकरोडचा उपक्रम

एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या भारतीय जवानांसाठी “राख्या” ; जेसीआय नाशिकरोडचा उपक्रम

0
601 Post Views

देवळाली कॅम्प, प्रतिनिधी

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात राखी बनविण्याची स्पर्धा पार पडली. भारतीय जवानांना राखी पाठविण्यासाठी ही स्पर्धा झाली. स्पर्धेत सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पिस्ता, शिंपले आदी विविध वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी राखी तयार करुन लक्ष वेधले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

ज्युनिअर चेंबर इंटनॅशनल व एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी [ दि. १७ ] तेजुकाया सभागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

एसव्हीकेटी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगीतले की, तवांग येथील दूर्गम भागात सेवा देणा-या जवानांची विरकथा विद्यार्थ्यांना कथन केली. भारतीय जवानांनी देशासाठी दिलेल्या बलीदानाची माहिती दिली.

जत्रा हॉटेल शिवारात स्वप्नातील घरांसाठी विश्वासपात्र एकमेव समृद्धी बिल्डकॉम

जेसीआय संस्थेचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष निलेश शिंदे म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जेसीआय विविध उपक्रम राबवत असते. तसेच देशभक्तीवर आधारित उपक्रम राबविण्यासाठी प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी सहकार्य केल्याबददल शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती लता सोमासे, डॉ. जयश्री जाधव, भारती पाटील, कलावती सरगैय्या, संगीता बोराडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जे.पी. जाधव यांनी केले. आभार नाशिकरोड जेसीआयचे अध्यक्ष मोहन सानप यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version