Home राजकारण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात होडी सोडून केला महापालिका प्रशासनाचा धिक्कार

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात होडी सोडून केला महापालिका प्रशासनाचा धिक्कार

0
316 Post Views

नाशिकरोड, बातमीदार 
येथील बस स्थानक, व नाशिकरोड परिसरात पडलेले खड्डे अन ते बुजविण्यासाठी दुर्लक्ष करणारे महापालिका प्रशासन यांचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अन कार्यकर्त्यांनी खड्ड्या मध्ये होडी सोडून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाने सुस्तवलेले प्रशासन दखल घेईल, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हॉटेल जत्रा शिवारातील स्वप्नातील घरांसाठी समृद्धी बिल्डकॉम

नाशिकरोड बस स्थानकात मध्ये असलेल्या खड्ड्यांत पाण्याचे तळे झालेले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात ‘होडी’ सोडून प्रतीकात्मक आंदोलन केले या वेळी प्रशासनाचे ‘लाडके ठेकेदार ‘ व ‘खड्डे बेकार’ अशा जोरदार घोषणाही दिल्या, आंदोलनावेळी मनसेचे शहर संघटक अॅड. नितीन पंडित , विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे , प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी व बाजीराव मते , मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे ,रंजन पगारे , महिला शहर अध्यक्ष भानुमती अहिरे, महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे , शुभम चव्हाणके , वैभव शिंदे उपस्थित होते
नाशिकरोड बसस्थानकात सह, जेल रोड व नाशिकरोड येथील फ्लाय ओव्हर वरील रस्ते , मुख्य रस्ते व कॉलोनी रस्ते खड्ड्यांनी रस्त्याची चाळण झालेली आहे त्यामुळे प्रवाशांची व नागरिकांची वाट बिकट झालेली आहे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे नाशिक शहराला स्मार्ट बनविण्याचे स्वप्न प्रशासनाकडून नागरिकांना दाखविले जात आहे दुसरी कडे हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या नाशिकरोड बस स्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे , लोकसभेच्या तोंडावर प्रशासनाने मुख्य रस्ते केले होते परंतु ते पावसा मध्ये उखडून गेले आहेत , शहरातील रस्ते निकृष्ठ दर्जाचे तयार होत असल्याने, ठेकेदार प्रशासनाचे लाडके आहेत कि काय ? खड्डे भ्र्रष्टचाराचे अड्डे झाले आहेत कि काय ? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलना दरम्यान विचारण्यात आला आहे. जेलरोड ते कन्या शाळा च्या रस्त्याची दैना झालेली आहे , नाशिकरोड बस स्थानकात देखील तीच अवस्था आहे , नाशिकरोड बस स्थानक हे शहरातील सर्वात जास्त वर्दळीचे बस स्थानक आहे. सर्वात जास्त महसूल मिळवून देण्यात या बस स्थानकाचा वाटा मोठा असला तरी, या बसस्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे मात्र परिवहन महामंडळाने साफ दुर्लक्ष केलेले दिसून येते. आजही या बस स्थानकावर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही . बस स्थानक प्रशासनाचे स्वतःचे स्वछतागृह नाही तसेच कँटीन देखील उपलब्ध नाही, या परिसरा मध्ये कचराकुंडी उपलब्ध नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याच बरोबर प्रवासी शेडलाही अस्वछतेचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे, संपूर्ण बस स्थानकावर खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून प्रवाशांना उभे राहणे देखील अवघड होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे दुरुस्ती अगदी थातूरमातुर पद्धतीने करून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची थट्टाच केली आहे, प्रशासनाने लवकरात या समस्या दूर करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित यांनी केली अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version